शिक्षक अभ्यास मंडळाचे व्यासपीठ....

 

शिक्षक़ अभ्यास मंडळाच्या व्यासपीठावर आपले स्वागत ! शिक्षक अभ्यास मंडळ हा क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट  या संस्थेने चालवलेला उपक्रम आहे. शिक्षकांच्या  व्यावसायिक कौशल्यांचा निरंतर विकास हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू आहे. शिक्षक अभ्यास मंडळाचे सदस्य महिन्यातून एकदा पूर्व नियोजित दिवशी एकत्र भेटतात. आधीच ठरवलेल्या एखाद्या विषयावरील लेख वा पुस्तक वाचून त्यावर सादरीकरण करतात. सादरीकरणाबाबत इतर सहकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात व चर्चा पुढे नेतात. शिक्षक अभ्यास मंडळाच्या दोन सभांच्या दरम्यान एकमेकांशी संपर्कात राह्ता यावे म्हणून या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक अंतर, किंवा इतर अडचणींमुळे जे शिक्षक अभ्यास मंडळाच्या सभेला येऊ शकत नाहीत त्यांनाही या व्यासपीठाद्वारे चर्चेत भाग घेता येतो.
 
या व्यासपीठावर शिक्षणाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा चालते. शिक्षकांव्यतिरिक्त, अध्यापक विद्यालयाचे ( डी एड कॉलेज ) शिक्षक, शिक्षणात रस असणार्‍या व्यक्ती, शिक्षण क्षेत्रात काम करणारे तज़्ज्ञ असे अनेक जण या व्यासपीठावर चर्चा करत असतात. सगळेचजण एकमेकांकडून खूप काही शिकत असतात.एकमेकांच्या अडचणी समजावून घेऊन .त्या सोडवण्याचा सासमुहिक प्रयत्न करत असतात. महानगरांपासून ते दुर्गम भागातील खेड्यांपर्यंत पसरलेल्या शाळांमधून शिकवणारे शिक्षक व शिक्षणप्रेमी व्यक्ती यांना घरबसल्या  एकत्र येण्याची संधी या व्यासपीठामार्फत मिळते.
 
तुम्ही या व्यासपीठावर प्रश्न विचारू शकता, व्यासपीठावरील वाचनसाहित्याचा वापर करू शकता, एखाद्या प्रश्नावर मतदान घेऊ शकता,आपले अनुभव मांडू शकता  किंवा तुमच्या आसपास घडणार्‍या शिक्षण विषयक कार्यक्रमांची माहिती इतरांपर्यंत पोहचवू शकता. व्यासपीठावर येण्यासाठी तुम्हाला  नावनोंदाणी करावी लागेल.मोफत नावनोंदणीसाठी  पुढील दुव्यावर क्लिक करा.